पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यावर जनता त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतात, परंतु एखाद्याला जर दुर्बुध्दी झाली तर मग तोंड लपवण्याची पाळी येते, एका खानदेशी महिला कलाकाराला सध्या अशीच तोंड लपविण्याची पाळी आली आहे. कारण झटपट पैसे मिळवण्याच्या नादात गैरमार्गाला लागून तिने आपल्या प्रियकरासह सुमारे दीडशे पेक्षा जास्त नागरिकांना गंडा घातला. त्यामुळे पोलिसांनी अखेर कसून चौकशी करीत त्या दोघांना अटक केली असून या प्रकरणामुळे खानदेश भागात खळबळ माजली असून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार या खांदेशी पट्ट्यात लग्नकार्य असो की एखादे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम डीजे वर खानदेशी गाणी लावण्याची जणू प्रथा परंपराच झालेली आहे, त्यामुळे गाणी नेहमीच लावली जातात. त्यामुळे साहजिकच अनेक खानदेशी कलाकार लोकप्रिय झाले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे दिपाली पौनीकर उर्फ दिपू क्वीन हिने याबाबत मोठी लोकप्रिय मिळवली होती. गेल्या तीन चार वर्षात तर दीपू क्वीन ही खानदेशी गाण्यांमधली प्रसिध्द कलाकार झाली होती. सोशल मीडीयात तिच्या व्हिडीओचा चांगलाच बोलबाला होता. तिने खांदेशातच नव्हे तर पुणे, मुंबईत देखील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही ती सादर केले होते. त्यात तिला चांगला पैसाही मिळत होता. परंतु तिला आणखी श्रीमंत होत असल्याने व्हायचे असल्याने वाईट मार्ग सुचला.
पटकन श्रीमंत होण्यासाठी तिला वाईट मार्ग सुचला आणि तिथेच तिची दैव फिरले असे म्हणता येईल, त्यामुळे मग दीपू क्वीन आणि तिचा प्रियकर हेमंत बावसार यांनी पुण्यात मानधन मायक्रो फायनान्स या नावाने कार्यालय थाटून तत्काळ कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रूपये उकळले. इतकेच नव्हे तर तुम्ही आमच्या कंपनीत पैसा गुंतवल्यास तुम्हाला लकी ड्रॉ द्वारे धनलाभ देखील होईल, असे अनेकांना आमिष दाखवले. काहीजण त्या अमिषाला बळी पडले. त्यात पैकी सांगलीमध्ये ६ जणांना फसवले त्यात एका दाम्पत्याला १० हजारापेक्षा कमी दराने सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही जणांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते.
कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे, असे सांगत विराज कोकणे आणि दीपाली कोकणे या दाम्पत्याची मोठी फसवणूक केली आहे. दिपू आणि तिच्या प्रियकरांनी कोकणे दांपत्याकडून चक्क ५३ लाख रुपये लुबाडले. त्याचप्रमाणे पुण्यातील इतरांची देखील असेच फसवणूक करून या दोघांनी लाखोंचा गंडा घातला होता. आणि गुजरातला पळून गेले होते. त्यानंतर कलाकार दिपू क्वीन आणि तिच्या प्रियकराने स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कारण फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून या दोघांना शोधून अटक केली.
विशेष बाब म्हणजे या दोघांचे व्हिडीओ बघितल्यावर प्रत्यक्षात अटक करायला गेलेले पोलीस या दोघांना सुरूवातीला त्यांना ओळखू शकले नाहीत, कारण गुजरातला पळून गेल्यावर एका झोपडपट्टीत हे दोघे राहत होते. त्यामुळे आभासी दुनियेचे कलाकार प्रत्यक्षात मात्र भुरटे चोरटे निघाले आहेत. झटपट पैसे मिळवायचे नादात नागरिका आमिषाला बळी पडतात तेव्हा चोरटे काहीही करायला तयार होतात, परंतु अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नागरिक त्यापासून धडा घेत नाहीत, असे दिसून येते.
Pune Crime Bunty Babli 150 Cheating