गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळनंतर महिला असुरक्षित? अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली… (व्हिडिओ)

नोव्हेंबर 14, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
FhF YZVIAALYAG scaled e1668352997310

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘विश्वसुंदरी’ हा किताब पटकावणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. युनिसेफसाठी ती आता तीन वर्षानंतर भारतात आली. भारतात आल्यावर तिने युनिसेफच्या कामाची पाहणी केली. लखनऊमधील युनिसेफच्या ऑफिसचा दौरा केला होता. आता तिने उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल भीती व्यक्त केली आहे. मात्र यावर उत्तरप्रदेश महिला आणि बाल सुरक्षा संघटनेच्या अतिरिक्त महासंचालक यांनी तिला थांबवत पोलीस कशाप्रकारे महिला, मुलींसाठी झटत असल्याचे प्रत्यक्षात दाखवून दिले.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने युनिसेफसाठी भारताचा दौरा केला. युनिसेफ इंडियाची ॲम्बेसिडर असलेली प्रियांका तिच्या भारत दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशमधील खेड्यांमध्ये फिरताना दिसली. तिथे तिने वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या. यावेळी तिने मुलांचं शिक्षण, त्यांच आरोग्य, पोषण तसंच सुरक्षिततेच्या बाबतीत सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. मुलांच्या प्रश्नांबरोबरच प्रियांकाने महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी २४ तास कार्यरत कंट्रोल रूमलाही भेट दिली.

दरम्यान, प्रियांकाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत ती महिला पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना दिसत आहे. प्रियांका त्यांना विचारते, “मला एक गोष्ट सांगा, मी देखील लखनऊमध्ये राहिले आहे. इथे एक प्रकारची भीती वाटते…खास करून संध्याकाळी सात वाजल्यानंतर मात्र तिचे वाक्य मध्येच थांबवत उत्तरप्रदेश महिला आणि बाल सुरक्षा संघटनेच्या अतिरिक्त महासंचालक नीरा रावत म्हणतात, “मी तुम्हाला थेट डेटा दाखवते.” त्या तिला कंट्रोल रूममध्ये घेऊन जातात. कंट्रोल रूममधून कशा प्रकारे काम केलं जातं याची माहिती त्या प्रियांकाला देतात. नव्या तंत्रज्ञानामुळे मदतकार्य सोपं आणि जलद झाल्याचं पाहून प्रियांकालाही समाधान वाटते.

हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने लिहिलं आहे की, महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता नितांत गरजेची आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचार आणि छळाच्या अनेक गोष्टी आपण भारतभरातून रोज ऐकतो. तेव्हा या क्षेत्रात बरेच काम करणे आवश्यक आहे. याची सुरुवात त्यांच्याबाबत असलेल्या कायद्यापासून होते. याबाबत मी माहिती घेत असताना मी नीरा रावत यांना भेटले. त्यांच्यामुळे मला १०९० वुमन पॉवर लाईन (WPL) उत्तर प्रदेशातील २४/७ सुरू असलेल्या फोन लाईनला भेट देण्याची संधी मिळाली. इथे महिला कोणत्याही प्रकारच्या अत्याचार आणि लैंगिक छळाच्या तक्रारी मुक्तपणे नोंदवू शकतात. हे मदतकार्य महिला आणि बाल सुरक्षा संघटना उत्तर प्रदेश पोलिसांच्या नेतृत्वाखाली लखनौमध्ये आहे.

वुमन पॉवर लाईनची उत्तर प्रदेशात २४ तास सेवा असलेली १५४ कार्यालये आहेत. १०९० हेल्पलाइनद्वारे कोणत्याही तक्रारीला प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून, पीडित-केंद्रित आणि हिंसाचार रोखण्याच्या उद्देशाने याची रचना केली आहे. प्रत्येक कॉलसाठी उत्तरदायित्व असल्याची खात्री करून, वेगाने प्रतिसाद देण्यास आणि संरक्षण करण्यास सक्षम होण्यासाठी WPL तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करते. छेडछाड आणि पाठलाग करण्यापासून ते लैंगिक छळ आणि घरगुती हिंसाचार इत्यादी प्रकरणांपर्यंत, कॉलर्सच्या संरक्षणास अग्रस्थानी ठेवून प्रतिसाद देण्यासाठी संघांना प्रशिक्षण दिले जाते.

भारतात, महिला आणि मुलांवरील हिंसाचार व्यापक आहे, तरीही बहुतांश स्त्रिया आणि मुले त्याची तक्रार करत नाहीत. पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचाराच्या भीतीमुळे कदाचित ते पुढे येत नाहीत पण आशा आहे की अशा हेल्पलाइनमुळे ते पुढे येतील आणि आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतील. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे पण यासारखे उपक्रम ही एक उत्तम सुरुवात आहे आणि जर ते प्रभावीपणे अंमलात आणले गेले तर ते हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आणि संपवण्यासाठी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी उत्तर ठरू शकत असल्याचे मत प्रियांका चोप्राने व्यक्त केले.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Priyanka Chopra on Uttar Pradesh Women Insecurity

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिद्धांत वीर सूर्यवंशींच्या मृत्यूबद्दल समोर आली ही धक्कादायक माहिती

Next Post

मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री असताना लोकार्पण – देवेंद्र फडणवीस; अशी आहे नागपुरातील ई लायब्ररी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
FhYusqWaYAAl8fZ e1668353766969

मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री असताना लोकार्पण - देवेंद्र फडणवीस; अशी आहे नागपुरातील ई लायब्ररी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011