बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री असताना लोकार्पण – देवेंद्र फडणवीस; अशी आहे नागपुरातील ई लायब्ररी

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 5:12 am
in राज्य
0
FhYusqWaYAAl8fZ e1668353766969

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असून ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेवाडा येथील लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत दक्षिण नागपुरात ई – लायब्ररीच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, सुधाकर कोहळे ,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी व नगरसेवक उपस्थित होते.
आमदार मोहन मते यांनी या लायब्ररीसाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असून नागपूर विदर्भातील या पद्धतीची ही पहिली ई -लायब्ररी आहे. याचा निश्चितच तरुणाईला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी शहरातील मोकळ्या जागांचा योग्य उपयोग होण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम,खेळांची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका उघडण्याचे प्रस्ताव ठेवले होते. आज या ठिकाणी अशी एक सुंदर व्यवस्था निर्माण झाली असून या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी मानेवाडा ई -लायब्ररी केंद्र ठरत आहे. याचा आनंद आहे. गरज असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची देखील व्यवस्था केली जाईल ,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी ई – लायब्ररीचे लोकार्पण जाहीर केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी अप्रतिम सुविधा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक आहे.ज्ञान ही ऊर्जा असून ई- लायब्ररीच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार मानेवाडा परिसरात खुले झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला असून नागपूर सुधार प्रन्यास व आमदार मोहन मते यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.

LIVE | ई-लायब्ररीचा लोकार्पण सोहळा, दक्षिण नागपूर https://t.co/BRKNzVH2DI

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 12, 2022

Nagpur E Library DYCM Devendra Fadanvis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळनंतर महिला असुरक्षित? अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली… (व्हिडिओ)

Next Post

वारंवार चित्रपट फ्लॉप होत असल्याने अखेर अभिनेता अक्षय कुमार करणार ही घोषणा

India Darpan

Next Post
akshay kumar

वारंवार चित्रपट फ्लॉप होत असल्याने अखेर अभिनेता अक्षय कुमार करणार ही घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011