India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिद्धांत वीर सूर्यवंशींच्या मृत्यूबद्दल समोर आली ही धक्कादायक माहिती

India Darpan by India Darpan
November 14, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आरोग्य किती महत्त्वाचं आहे, हे कोरोना काळाने सर्वांनाच दाखवून दिलं आहे. असं असलं तरी कोणतीही गोष्ट प्रमाणात करणे महत्त्वाचे असते. व्यायामातही ही काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायाम करताना सावधानता आणि काळजी महत्त्वाची ठरते. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं शुक्रवारी जीममध्ये व्यायम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यानंतर ही गोष्ट ठळकपणे समोर आली आहे.

सिद्धांतच्या निधनाने संपूर्ण टीव्ही जगताला धक्का बसला. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धांतच्या संपूर्ण कुटुंबाला यामुळे धक्का बसला आहे. आता निधनानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. सिद्धांतच्या जीम ट्रेनरने त्याला वर्कआऊट न करण्याचा सल्ला दिला होता अशी चर्चा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याने वर्कआउट सुरुच ठेवल्याचे समजते.

सिद्धांत वीर सूर्यवंशी ज्या जिममध्ये वर्कआऊट करत असे त्या जिममधील एका व्यक्तीने सिद्धांतबद्दल माहिती दिली. ११ नोव्हेंबरला जेव्हा सिद्धांत जिममध्ये आला होता तेव्हा त्याने डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याच्या ट्रेनरने त्याला व्यायाम न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो बाजूला बसला. मात्र, तेथे बसल्यानंतर तो खाली पडला. सिद्धांतला बेशुद्धावस्थेत पाहून जवळच्याच कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ४५ मिनिटे त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित व्यक्तीने सांगितले की, १५ वर्षांपासून सिद्धांत आपला अर्धा वेळ जिममध्ये घालवत असे.

सिद्धांत वीर सूर्यवंशी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता होता. घराघरात पोहचलेल्या सिद्धांत वीरने ‘कसौटी जिंदगी की’, ‘जिद्दी दिल माने ना’, ‘ममता’, ‘जमीन से आसमान तक’, ‘विरोध’, ‘भाग्यविधाता’, ‘क्या दिल में है’, ‘गृहस्थी’ आदी टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याची जवळची मैत्रीण विश्वप्रीत कौर हिने सिद्धांतबद्दल सांगितले की, “काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. तिने सिद्धांतला डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्लाही दिला होता पण त्याने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर येत आहे.

Siddhant Suryavanshi Vir Death Shocking Info


Previous Post

लोक अदालतीत या पंचायत समितीची लॉटरी; तब्बल ६० लाखांची वसुली

Next Post

उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळनंतर महिला असुरक्षित? अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली… (व्हिडिओ)

Next Post

उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळनंतर महिला असुरक्षित? अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group