नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी २० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजप समिती कार्यरत करण्यात आली आहे आणि या समितीचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची तर समिती सदस्य म्हणून प्रदीप पेशकार नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार निरंजन डावखरे, शायना एन सी, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ.अजित गोपछडे, श्वेता शालिनी, दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे. पेशकार यांचा सलग २५ वर्षे उद्योग क्षेत्रात तर सलग १५ वर्ष भाजपा विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत असल्याचा त्यांचा अनुभव असल्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे.राज्यभरात होणारे जी- २० परिषदेचे कार्यक्रम करताना रचनात्मक लोकसहभाग, युवा वर्गामध्ये आगामी संधीं बद्दल जनजागृती, शिक्षण, उद्योग ,सहकार , आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक, आणि डिजिटल क्षेत्रात तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संधी मांडणे यावर या समितीचा भर असणार आहे.