मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जागा शिवसेनेची मग भाजपचा उमेदवार का? ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’ने उमेदवार का नाही दिला? यापुढेही शिंदे गटाचे असेच होणार?

ऑक्टोबर 14, 2022 | 12:25 pm
in संमिश्र वार्ता
0
Eknath Shinde e1665130048489

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्याजागी होत असलेली पोटनिवडणूक सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, शिवसेनेत पडलेली फूट, राजकारण, कुरघोड्या यामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. अखेर आता त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या पोटनिवडणुकीत मात्र सध्या जोरदार चर्चा शिंदे गटाचीच होत आहे. कारण, ही जागा शिवसेनेची असताना बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटाने येथे उमेदवार का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या जोरावर भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गटाने एकच दावा केला आहे की, खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यानंतर न्यायलयीन लढाई, निवडणूक आयोगाकडील तक्रार या सर्व बाबी घडल्या. शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे सुद्धा गोठवले गेले. त्यानंतरही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा न स्विकारणे, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेणे, न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने तो मंजूर करणे यावरुन राज्यभरातच सध्या ही निवडणूक चर्चेची बनली आहे.

शिंदे गट सातत्याने दावा करीत आहे की, तेच खरी शिवसेना आहे. ठाकरेंचे तेच खरे वारसदार आहेत. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. मात्र, शिंदे गटाने अंधेरी निवडणुकीत त्यांचा उमेदवार दिलेला नाही. शिवसेनेची जागा असतानाही शिंदे गटाने उमेदवार का दिला नाही, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. याउलट शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपने उमेदवार दिला असून शिंदे गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था आहे. यापुढील काळातही शिवसेनेच्या जागांवर भाजप दावा करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील अन्य कुणीही काहीही बोलत नसल्याने शिंदे समर्थकांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.

गुरुवारी तीन अर्ज दाखल
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

Politics Shivsena Andheri Bypoll Election Candidate
BJP Uddhav Thackeray Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

CBI नाशिक कारवाई – लाचखोर मेजर आणि इंजिनिअरला थोड्याच वेळात कोर्टात आणणार

Next Post

किरीट सोमय्यांच्या मुलाने अवघ्या १४ महिन्यात मिळवली पीएचडी; राज्यात सर्वत्र जोरदार चर्चा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
neil kirit somaiya

किरीट सोमय्यांच्या मुलाने अवघ्या १४ महिन्यात मिळवली पीएचडी; राज्यात सर्वत्र जोरदार चर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011