India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

डॉ. अमोल कोल्हे भाजपत येणार मग, शिंदे गटाच्या आढळराव-पाटलांचे काय होणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

India Darpan by India Darpan
April 8, 2023
in संमिश्र वार्ता
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्ता गुरुत्वाकर्षणासाठी असते असे म्हटले जाते, तिच्याकडे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आकर्षित होतात. गेल्या काही दिवसात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) असो की भाजप या पक्षामध्ये विरोधातील अनेक नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करत असल्याचे दिसून येते. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा अनेक दिवसापासून सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक फक्त केल्याने या चर्चेला आणखीन रंग चढला आहे.

सध्या राज्यात भाजपने आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या वेळी शिरूर मतदानसंघातून आढळराव पाटील लढले होते. तर सन २०१९ला तिथे आढळरावांना पाडून अमोल कोल्हे खासदार झाले. मात्र समजा जर अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी असे वाटले की, आपण भाजपामध्ये प्रवेश करावा. मग विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट द्यावे लागेल. कारण अढळरावांसारखा तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तरी आढळरावांना समजावलेच जाईल की, कोल्हे विद्यमान खासदार आहेत. मग कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की, त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची? असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? अशा चर्चा सध्या रंगत आहेत, याला कारण म्हणजे अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचे प्रचारचिन्ह शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता, त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यावर स्पष्टीकरण देत कोणीही कोणताही गैरसमज करून न घेण्याचे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले होते.

आता भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. पाटील यांनी या मुलाखतीमध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याविषयी भाष्य केले.

तसेच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाविषयी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर या संदर्भात बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला होता. आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्य संदर्भात कोणता खुलासा येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Politics Shirur Dr Amol Kolhe BJP Shinde Group


Previous Post

मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ; असे आहेत सर्वेक्षणाचे निष्कर्ष

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील पाहुणचारावर कपात; जोरदार टीका झाल्यानंतर निर्णय

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील पाहुणचारावर कपात; जोरदार टीका झाल्यानंतर निर्णय

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group