पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या आज बचावल्या. शहरातील एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. या कार्यक्रमात त्या दीपप्रज्वलन करीत होत्या. त्याचवेळी त्यांच्या साडीला आग लागली. मात्र, ही बाब तत्काळ उपस्थितांच्या लक्षात आली आणि त्यांनी सुळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचक्षणी तातडीने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने सुळे या बालंबाल बचावल्या आहेत. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.
खासदार सुप्रिया सुळे या विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. हिंजवडी भागामध्ये कराटे क्लासेस प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन होते. या समारंभाच्या प्रारंभी व्यासपीठावर दीप प्रज्वलन करण्यात येत होतो. त्याचवेळी समईची ज्योत ही सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदराच्या संपर्कात आली. त्यामुळे साडीने पेट घेतला. ही बाब व्यासपीठावर उपस्थितांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने सुप्रिया सुळे यांना सांगितली. त्यांनी तातडीने ही आग विझविली. या दुर्घटनेत त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्या सुखरुप आहेत. काळजी करण्याचे कारण नसून त्यांनी हा कार्यक्रम आटोपून दुसऱ्या कार्यक्रमालाही हजेरी लावली आहे.
https://twitter.com/soneshwar_patil/status/1614536840127873025?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
Politics Pune NCP Supriya Sule Saree Fire Incidence Video