India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यामागे भाजपच; असा आहे राजकीय डाव

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेत नागपुरातील भूखंड घोटाळ्याचा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न न्यायालयात असला तरी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड अडचणीत आले आहेत. कारण, तत्कालिन नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी भूखंडाचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा सत्ताधारी सहकारी खुद्द भाजपच अडचणीत आणत असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी दिशा सालियान मृत्यू प्रकरण बाहेर काढण्यात आले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याची माहिती देत संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला तसेच या आरोपांमागे भाजपाच्या आमदारांचा हात असल्याचाही आरोप केला.

राऊत म्हणाले की, ज्या भूखंडावरुन तत्कालीन नगरविकास मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत, तो मुद्दा खरेतर याआधी भाजपाच्याच आमदारांनी तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण लटके यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपाच्याच आमदारांनी उपस्थित केलेला तारांकित प्रश्न आम्ही यावेळी लावून धरला आहे, असे राऊत म्हणाले. इतकेच नव्हे, तर एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत एक विधान केले होते. ते म्हणाले होते की, जोपर्यंत मी प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पहायचे आहे. या विधानाच्या दोनच दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांविरोधातील हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे खोके सरकारने विशेषतः शिंदे गटाने भाजपाचे राजकारण समजून घ्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे नागपूर न्यास भूखंड घोटाळा इतका गंभीर आहे की, यात १०० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार आहे. त्यावर आम्ही नव्हे तर न्यायालयानेच प्रश्न उपस्थित केले आहेत. लिहून देतो शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल, तुम्ही आमच्या फाइल बाहेर काढत आहात. पण आम्ही लढत राहू. एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला तुमच्या घरातल्या फाइल बाहेर निघाल्या तर त्या सेंट्रल हॉलपर्यंत जातील. शिंदे गटात सामील झालेल्यांच्या सर्व फाइल कशा बंद झाल्या? भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या आज कुठे गेलेत? त्यांना मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आज दिसत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.

Politics Nagpur Land Scam CM Eknath Shinde BJP Strategy


Previous Post

महाराष्ट्र अंडर प्रिव्हीलेज्ड टीचर असोसिएशन (मुप्टा) नाशिक अध्यक्षपदी डॉ. रवी बागुल तर सचिवपदी डॉ. लक्ष्मीकांत कावळे

Next Post

नाशिकच्या पुष्पाची चर्चा; विभागीय महसूल आयुक्तांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडाचे खोड नेले चोरुन

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिकच्या पुष्पाची चर्चा; विभागीय महसूल आयुक्तांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडाचे खोड नेले चोरुन

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group