मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रॅण्ड संदीप देशपांडे एका जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असून हा हल्ला कुणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून होते. हल्लेखोरांनी देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.
स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसून हाताला फ्रॅक्चर आहे. हिंदुजा हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, आपण कुणालाही घाबरत नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावर हल्ला करणारे कोण आहेत, हे सर्वांना माहिती असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. मात्र, त्यांनी कुणाचेही स्पष्ट नाव घेतले नाही.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1631510845795753985?s=20
भ्याड हल्ल्याचा निषेध, अटकेची मागणी
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मनसेने निषेध केला आहे. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी, ‘हल्लेखोरांना अटक केली नाही तर काय होईल याची जबाबदारी ही पोलिसांची राहील,’ असा देखील इशारा दिला आहे.
https://twitter.com/KirtikumrShinde/status/1631536801436536832?s=20
Politics MNS Leader Sandeep Deshpande Reaction After Attack