India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्राणघातक हल्ल्यानंतर हॉस्पिटलबाहेर येताच मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे म्हणाले…

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रॅण्ड संदीप देशपांडे एका जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असून हा हल्ला कुणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून होते. हल्लेखोरांनी देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.

स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसून हाताला फ्रॅक्चर आहे. हिंदुजा हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, आपण कुणालाही घाबरत नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावर हल्ला करणारे कोण आहेत, हे सर्वांना माहिती असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. मात्र, त्यांनी कुणाचेही स्पष्ट नाव घेतले नाही.

आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( @SandeepDadarMNS ) ह्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला.. त्याचा तीव्र निषेध !

पोलिसांनी दोषींना ताबडतोब अटक करावी आणि शासन करावे…!

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 3, 2023

भ्याड हल्ल्याचा निषेध, अटकेची मागणी
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मनसेने निषेध केला आहे. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी, ‘हल्लेखोरांना अटक केली नाही तर काय होईल याची जबाबदारी ही पोलिसांची राहील,’ असा देखील इशारा दिला आहे.

आमचे नेते संदीप देशपांडे म्हणजे मनसेची तोफ आहेत तोफ! स्टंप,रॉडच्या हल्ल्याने राजसाहेबांची ही तोफ एक इंचही मागे हटणार नाही. उलट, आता ही तोफ जेव्हा हल्लेखोर आणि त्यांच्या मास्टरमाईंडवर तोफगोळे डागेल तेव्हा त्या सर्वांच्या चड्ड्या पिवळ्या होतील.
गुंडांनो आणि गांडूंनो, सावध रहा!

— कीर्तिकुमार शिंदे (@KirtikumrShinde) March 3, 2023

Politics MNS Leader Sandeep Deshpande Reaction After Attack


Previous Post

कार व दुचाकीच्या अपघातात तरूणाचा मृत्यू; कार अचानक वळविल्याने झाला अपघात

Next Post

अभिनेता अर्शद वारसीसह त्याच्या पत्नीवर ‘सेबी’ची मोठी कारवाई; आता पुढे काय होणार?

Next Post

अभिनेता अर्शद वारसीसह त्याच्या पत्नीवर ‘सेबी'ची मोठी कारवाई; आता पुढे काय होणार?

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group