इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज, शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांचे वय १०० होते. आईच्या निधनावर पंतप्रधानांनी भावनिक ट्विट केले. आईचे निधन म्हणजे एका गौरवशाली शतकातील देवाच्या चरणी थांबणे असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या जून महिन्यातच हिराबेन यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी हिराबेन यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी हिराबेन यांची प्रकृती बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने अहमदबादच्या युएन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंतप्रधान मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची भेट घेतली. हिराबेन यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांची तब्ब्येत आणखी खालावली. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
आईच्या निधनानंतर मोदी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावले… आईमध्ये, मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचा समावेश होतो. त्यांनी पुढे लिहिले की, जेव्हा मी त्यांना तिला १०० व्या वाढदिवशी भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली होती, जी नेहमी लक्षात राहते की बुद्धीने काम करा आणि जीवन शुद्धतेने जगा.
https://twitter.com/narendramodi/status/1608622111660331012?s=20&t=13eTNnJUHMd3IuwgRpJ7Nw
देशात शोककळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह अनेकांनी हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
PM Narendra Modi Mother Hiraben Death at 100