India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींची पदवी गोपनीयच राहणार; गुजरात हायकोर्टाने केजरीवालांना केला दंड

India Darpan by India Darpan
March 31, 2023
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी जाणून घेणे आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडले आहे. गुजरात हायकोर्टाने यासंदर्भात मोठा निकाल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्या दाखवण्यासंबंधीचा माहिती आयुक्तांचा आदेश हायकोर्टाने रद्द केला आहे. मुख्य माहिती आयोगाने (CIC) आपल्या आदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे तपशील सादर करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालय, गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्याच्या जन माहिती अधिकार्‍यांना दिले होते. तेच कोर्टाने रद्द केले आहेत.

हायकोर्टाच्या एकल खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांनी माहिती आयुक्तांचा आदेश रद्द केला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अरविंद केजरीवाल यांना ही रक्कम गुजरात राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी लागणार आहे.

यापूर्वी 2016 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागवला होता. मात्र, त्याची गरज नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

या निकालानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किती वाचन केले, त्यांचे शिक्षण किती हे जाणून घेण्याचा अधिकारही देशाला नाही का? न्यायालयात पदवी दाखवण्यास त्यांनी कडाडून विरोध केला. का? आणि त्यांची पदवी पाहण्याची मागणी करणाऱ्यांना दंड होणार? हे काय होत आहे? अशिक्षित किंवा कमी शिक्षित पंतप्रधान देशासाठी अत्यंत घातक असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली आहे.

क्या देश को ये जानने का भी अधिकार नहीं है कि उनके PM कितना पढ़े हैं? कोर्ट में इन्होंने डिग्री दिखाए जाने का ज़बरदस्त विरोध किया। क्यों? और उनकी डिग्री देखने की माँग करने वालों पर जुर्माना लगा दिया जायेगा? ये क्या हो रहा है?

अनपढ़ या कम पढ़े लिखे PM देश के लिए बेहद ख़तरनाक हैं https://t.co/FtSru6rddI

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 31, 2023

पंतप्रधान मोदींच्या डिग्री बाबतची माहिती RTI अंतर्गत देण्याची गरज नाही: गुजरात हायकोर्टाचा निकाल

याचिकाकर्ते अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही

जनहिताची माहिती नसून, खोडसाळपणे माहिती मागितल्याचं कोर्टाचं निरीक्षण

2016 मध्ये तत्कालीन माहिती आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द

— Prashant Kadam (@_prashantkadam) March 31, 2023

PM Narendra Modi Degree Certificate High court Order


Previous Post

राज्य सरकारचा रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय; उद्यापासूनच लागू होणार

Next Post

रेल्वे स्टेशनच्या वेटिंग हॉलमधून लॅपटॉपची चोरी; लोहमार्ग पोलिसांनी २४ तासाता लावला छडा

Next Post

रेल्वे स्टेशनच्या वेटिंग हॉलमधून लॅपटॉपची चोरी; लोहमार्ग पोलिसांनी २४ तासाता लावला छडा

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group