पंतप्रधान किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. मात्र, हा निधी बँक खात्यात जमा झाला आहे किंवा नाही, याची खात्री कशी करावी, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यासंदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत.
असे चेक करावे
जर तुमच्या स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending असे लिहून येत असेल तर याचा अर्थ सरकारने आपण दिलेली माहिती कन्फर्म केली आहे. आणि लवकरच तुमच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले जातील.
जर Rft Signed by State Government लिहून येत असेल तर त्याचा Request For Transfer असा अर्थ होतो. एकूण काय तर तुमच्या अकाऊंटला कोणत्याही क्षणी २ हजार रुपयांचा हफ्ता जमा होऊ शकतो.
मात्र तरीही पैसे मिळाले नाही तर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री कमांकावर आपण माहिती विचारू शकता. पण त्यापूर्वी पासबुक अपडेट करावे किंवा मिनी स्टेटमेंट काढून बघावे.
अन्यथा केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन १५५२६१ किंवा टोल फ्री १८००११५५२६ या क्रमांकांवर तुम्ही फोन करू शकता.
तसेच कृषी मंत्रालयाच्या ०११-२३३८१०९२ या क्रमांकावरही फोन करता येणार आहे.