नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील ‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा’ या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “#एक्झामवॉरियर्स या पुस्तकात, एक मंत्र आहे, ‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती – तुमची स्वतःची शैली निवडा.’#परीक्षापेचर्चा काही दिवसांवर आली आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही परीक्षेची तयारी कशाप्रकारे करता ते यामधील रंजक अनुभवांसह सामायिक करा. हे आपल्या परीक्षा योद्ध्यांना नक्कीच प्रेरित करेल.”
https://twitter.com/narendramodi/status/1614890065343451136?s=20&t=OuDdATTnpQpZU252GmfAgg