पिंपळगाव बसवंत: माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेला राज्य शासनाकडून बक्षिसाची रक्कम १ कोटी ५० लक्ष जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या या निधीतुन शहराच्या वैभवात भर पडेल असे कार्य उभे करण्याचा मानस ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर यांनी व्यक्त केला आहे.
शासनाचा पुढाकार, गावाचा सहभाग या योजने अंतर्गत पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने माझी वसुंधरा अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवीत शहरातील पर्यावरण संतुलित राखण्यासाठी शहरात वार्डात उद्यान, पिंक सिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना, ओझोन पार्क, वृक्ष रोपण, स्मशानभूमी सुशोभिकरणं, वेस्टज पाण्याचा पुनर्वापर, आदी एक ना अनेक अभिनव उपक्रम राबविल्यानेच त्या कामाची दखल शासन दरबारी घेऊन पर्यावरण दिनी पिंपळगाव ग्रामपालिकेला सर्वोकृष्ट पुरकाराने सन्मानित करण्यात आले होते.
राज्य शासनाच्या वतीने राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपालिकेस बक्षिसाची रक्कम रु. १ कोटी ५० लक्ष जाहीर झाल्याने या निधीतून शहराच्या वैभवात भर घालणारी विकास कामे साकारण्याचा मानस ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
…..