सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लसीकरणानंतरही कोरोनाच्या या अवताराचा धोका कायम

by India Darpan
जुलै 10, 2021 | 6:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरणाने वेग पकडला असला तरी कोरोनाचे वेगवेगळे अवतार अजूनही धुमाकूळ घालत आहेत. लसीकरणामुळे कोरोनाला पूर्णपणे रोखता येणे शक्य आहे का याची चाचपणी वैज्ञानिकांकडून केली जात आहे. कोरोनाच्या अल्फा, बिटा, डेल्टा यासारख्या विविध अवतारांपासून बचाव करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक संसर्ग आणि लस कशाप्रकारे अँटिबॉडी बनतात, याबाबत फान्सच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. लस घेतलेल्या लोकांनाही त्याचा धोका असू शकतो. डेल्टा व्हेरिएंट अँटिबॉडीना चकवा देत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी १०३ लोकांची तपासणी केली. त्यामध्ये लस न घेतलेले अल्फाच्या संसर्गात आलेले लोक डेल्टाच्या तुलनेत कमी संवेदनशील आहेत. संशोधकांनी एस्ट्राजेनेका किंवा फायझर लशीचे एक किंवा दोन डोस घेतलेल्या ५९ लोकांच्या नमुन्यांचे परीक्षण केले.
एक डोस घेणार्या फक्त १० टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली. ही रोगप्रतिकारक शक्ती डेल्टा आणि बिटा व्हेरिएंटला सामान्य करण्यास सक्षम होती. लशीचा दुसरा डोस ९५ टक्के परिणामकारक दिसून आला. परंतु दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटिबॉडीमध्ये मोठे अंतर किंवा बदल दिसून आले नाही. त्यामुळेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा धोका आहे.
वेगाने लसीकरण करणे आवश्यक
जगभरात कोविडमुळे होणार्या मृत्यूचा आकडा बुधवारी ४० लाखांच्या वर पोहोचला आहे. विषाणूचा डेल्टा अवतार समोर आल्यानंतर वेगाने लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दीड वर्षांत झालेले मृत्यू हे १९८२ नंतर जगात झालेल्या सर्व प्रकारच्या युद्धांमधील मृत्यूच्या समान आहे, असा अंदाज पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओसलोने व्यक्त केला आहे.
लसीकरणानंतरही डेल्टाचा फैलाव
लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रतिदिन होणार्या मृत्यूचे प्रमाण घटून जवळपास ७,९०० वर पोहोचले आहे. जानेवारीत दररोज १८ हजारांवर मृत्यू होत होते. यादरम्यान भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरात खळबळ उडाली. यशस्वी लसीकरण झालेल्या देशांपैकी अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आता डेल्टा वेगाने फैलावत आहे.
वास्तवापेक्षा मृतांचा आकडा कमीच
जगभरात कोविडमुळे झालेल्या मृत्यूचा नवा आकडा समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टॅड्रॉस एडहेनॉम घेहरेयेसस यांनी सांगितले, महामारी एका धोकादायक वळणावर आहे. अनेक देशांमधून मृतांचा योग्य आकडा सांगितला जात नसल्याने ४० लाख मृतांचा आकडा वास्तविक संख्येपेक्षा अधिकच आहे. लस आणि सुरक्षा उपकरणांची साठेबाजी करणार्या देशांवर त्यांनी टीका केली. महामारी जणू पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या आवेगात अनेक  देशांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. लसीकरण झाले तरीही असा विचार कोणीच करू नका, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑक्टोबरमध्ये पेटणार  रासाकाची चिमणी, राज्याचे साखर आयुक्तांची  कारखाना कार्यक्षेत्राला भेट

Next Post

पिंपळगाव बसवंत: ग्रामपालिकेस माझी वसुंधरा अंतर्गत १ कोटी ५० लांखाचा निधी 

Next Post
IMG 20210709 184902 e1625898764145

पिंपळगाव बसवंत: ग्रामपालिकेस माझी वसुंधरा अंतर्गत १ कोटी ५० लांखाचा निधी 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011