नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी एक्सप्रेसचे इंजिनमध्ये कसारा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुसरे इंजिन मागवून ही सेवा सुरळीत केली. पण, या सर्व बदलामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अर्धा तासापेक्षा जास्त ही गाडी उभी होती. त्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्या धावू लागल्या. पूर्वी कसारा स्टेशनवर व इगतपुरी येथे रेल्वे इंजिन बदलत होते. पण, आता नव्या तंत्रज्ञानामुळे ते बंद झाले. पण, आता ही घटना घडल्यामुळे अनेकांना पूर्वी होणा-या या विलंबाची आठवण झाली.