नाशिक – नव्या ,अलवार स्वरांची रुणझुण आणि कोवळे शब्द यांची अनुभूती आज सकाळच्या किरणांनी सजून गेली आणि शब्दांना नवा साज देऊन गेली. नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. केतन इनामदार यांचे गायन गायन झाले त्यांना सौरभ ठकार (तबला) व संस्कार जानोरकर (संवादिनी) दिगंबर सोनवणे (पखवाज) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.
मैफिलीचे हे एकवीसावे पुष्प होते. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. केतन इनामदारचे सुरुवात नट भैरव रागाने केली, बडा ख्याल शब्द होते गुंज रही तर बंदिश होती सूरज चंदा.त्यानंतर राग ललत सादर केला ,ख्याल सांचे कहत हू मै आणि बंदिश होती जा रे बलमवा. राग आणि सादरीकरणाची अनोखी जाण केतनच्या गायनात होती .मैफिलीचा उतरार्ध घेई छंद मकरंद,आम्हा नकळे ज्ञान ,अवघे गर्जे पंढरपूर या रचनानी अनोखा सुरांचा बाज समोर आणला. मैफिलीत अभिनेते सयाजी शिंदे यांचे हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
सयाजी शिंदे यांनी सुर विश्वास उपक्रमाचे कौतुक केले व म्हणाले की संगीत ही ईश्वराची देणगी असून ते सादर करणारे कलाकार अलौकिक प्रतिभेचे असतात ते पुढे म्हणाले की,झाड लावणे ,त्याचे संगोपन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.पर्यावरण रक्षण ,निरोगी ,दीर्घायुष्य साठी झाडे लावणे काळाची गरज आहे.प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला झाडे लावण्याचा संकल्प करावा. सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
मैफिलीस,सहित्यिक रंगनाथ पठारे,राजन गवस,कवी प्रकाश होळकर,सुमती लांडे,संध्या नरे पवार, विलास हावरे, डॉ मनोज शिंपी ,संगीता चव्हाण , मिलिंद धटिंगण, मकरंद हिंगणे,पद्मजा कोतवाल , सी एल कुलकर्णी, एन सी देशपांडे,सतीश गायधनी ,डॉ हेमंत कोतवाल, आदी मान्यवर उपस्थित होते. विश्वास ठाकूर यांच्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाला ‘ग. ल. ठोकळ पुरस्कार (लघुकथा-प्रथम प्रकाशन)’ जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार विश्वास बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सायबर सुरक्षेविषयी स्वाती गोरवाडकर यांनी मार्गदर्शन केले