नाशिक – ओटीपी व्दारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. वेगवेगळी कारणे सांगून अनेक सायबर गुन्हेगार पैसे बँकेतून लंपास करत असल्याचेही समोर आले आहे. अशात आता कोविड डोस बाबत अचूक माहिती सांगून कॅाल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी थेट एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली असून त्यात सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
फसवणूक होऊ शकते…
OTP द्वारे फसवणूक करण्याचा नवा प्रकार चर्चेत आहे, कोविड डोस बाबत आपली अचूक माहिती सांगून कॉलद्वारे भुरळ टाकण्याचा प्रकार होईल, मेसेज द्वारे प्राप्त OTP विचारला जाईल. कृपया तशी माहिती देऊ नये आपली फसवणूक होऊ शकते.
सचिन पाटील (IPS), नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रा)