रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाकिस्तानकडून भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न फेल…भारताने पाकिस्तानची रडार स्टिस्टिमच केली उदध्वस्त

by India Darpan
मे 8, 2025 | 4:42 pm
in मुख्य बातमी
0
Untitled


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या रडार स्टिस्टिम उदध्वस्त केल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

संरक्षण विभागाकडून त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भातील ७ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच, यापुढे भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

या इशा-यानंतरही ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हे हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड’ व ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने निष्फळ ठरवले. या हल्ल्यांचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत.

आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचे प्रत्युत्तर त्याच स्तरावर आणि त्याच तीव्रतेने होते. यासंदर्भात विश्‍वसनीय सूत्राकडून आलेल्या माहितीप्रमाणे, लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून (एलओसी) विनाकारण गोळीबार वाढवला आहे. त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये गोळीबार केला.

या पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि पाच लहान मुलांसह सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले. सामान्य निष्‍पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले आहे. भारताने दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे पाकिस्तानकडून होणारा लहान तोफांचा आणि जास्‍त क्षमतेच्या तोफांचा गोळीबार थांबवण्यात आला.

भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपली गैर-उत्तेजक भूमिकेची बांधिलकी अधोरेखित केली आहे. पाकिस्तानी लष्करानेही भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा सन्मान केला, तरच भारताला ही भूमिका कायम ठेवणे शक्य होणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लाभार्थी महिलाना ई पिंक रिक्षाचे वितरण…

Next Post

लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट…पाकिस्तान सोडण्याच्या दिल्या सूचना

Next Post
trump 1

लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट…पाकिस्तान सोडण्याच्या दिल्या सूचना

ताज्या बातम्या

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011