मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहर व परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शहरासह परिसरातील अनेक भाग जलमय झाले होते. मनमाड जवळच्या मतोबाचे शिंगवे येथे ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने या भागातील कांदा शेतांमध्ये पाणीच पाणी साचले. या पाण्यामुळे नुकतीच लागवड केलेली कांदा रोप वाहून गेली. तर बाजरी आडवी झाली आहे. पहिल्यांदाच इतका या भागात पाऊस झाल्याचे शेतकरी सांगतात.