India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

११ वर्षांच्या संसाराचा काडीमोड; पॉप गायक हनीसिंग आणि पत्नी शालिनीचा घटस्फोट

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in मनोरंजन
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रॅपर आणि सुप्रसिद्ध पॉप सिंगर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. आता त्यांचा कायदेशिररित्या घटस्फोट झाला आहे. दिल्लीतील जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबीक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने हनी सिंगविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करत दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू होती. कोर्टाने घटस्फोट मंजूर केल्यानंतर हनी सिंग आणि शालिनी यांचा ११ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. पतीवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंधांसह अनेक गंभीर आरोप केले होते. हनी सिंग आणि शालिनी यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, परंतु तिला पोटगी म्हणून १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. हनी सिंगने शालिनीला न्यायालयात पोटगीचा एक कोटी रुपयांचा धनादेश सीलबंद कव्हरमध्ये शालिनीला दिल्याचे समोर आले आहे.

सासरच्यांवर गंभीर आरोप
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शालिनी तलवारने पती हनी सिंगविरोधात मारहाण आणि हल्ला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिने पतीसोबतच सासरच्या लोकांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. तिने दावा केला होता की, एक दिवस ती रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिचे सासरे सरबजीत सिंग दारूच्या नशेत खोलीत शिरले होते. सासऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला होता. याशिवाय शालिनीने पती हनी सिंगवर आरोप करत म्हटलं होतं की, लग्नानंतर हनी सिंग तिला मारहाण आणि शिवीगाळ करायचा. तसेच त्याचे लग्नानंतरही अनेक महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता.

अशी होती प्रेमकहाणी
हनी सिंग आणि शालिनी यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. इथून दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या दोघांनी २३ जानेवारी २०११ रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. मात्र हनी सिंगने जवळपास ४ वर्षे आपल्या लग्नाबद्दलची माहिती लपवून ठेवली होती.

Pop Singer Honey Singh and Wife Shalini Divorce
Entertainment


Previous Post

आयफोन घेण्यास इच्छुक आहात? भारतामध्ये आता स्वस्तात मिळणार नाही

Next Post

कांदा शेतात पावसामुळे पाणीच पाणी, बाजरीचे मोठे नुकसान ( बघा व्हिडिओ)

Next Post

कांदा शेतात पावसामुळे पाणीच पाणी, बाजरीचे मोठे नुकसान ( बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group