India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘येशू ख्रिस्तच खरा भगवान’, राहुल गांधींचा चर्चमधील व्हिडिओ व्हायरल

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या १५० दिवसांच्या भारत जोडो यात्रेवर आहेत. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका वादग्रस्त कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया यांची राहुल यांनी भेट घेतली. राहुल आणि पादरी यांच्यातील संभाषणाचा काही भाग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे.

मुत्तीदिचन पराई चर्चमधील हा व्हिडिओ आहे. राहुल गांधी आणि ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी विचारत आहेत की, “येशू ख्रिस्त हे देवाचे रूप आहे? हे खरे आहे का?” त्यांच्या प्रश्नावर पादरी जॉर्ज पोनिया म्हणाले की, “नाही, तोच खरा देव आहे.” पोनिया यांनी चिथावणीखोर विधाने केल्याचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, द्रमुक मंत्री आणि इतरांविरुद्ध अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून त्यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये मदुराईमधील कालिकुडी येथे अटक करण्यात आली होती.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या वक्तव्यावर हल्ला चढवला असून या यात्रेला ‘ब्रेक इंडिया’ यात्रा संबोधले आहे. त्यांनी म्हटले की, ‘जॉर्ज पोन्नय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ते म्हणतात की येशू हा एकमेव देव आहे. या व्यक्तीला यापूर्वीही हिंदू धर्माविरुद्ध द्वेषयुक्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांनी विचारले- ब्रेक इंडिया आयकॉनसह भारत जोडो यात्रा सुरू आहे का?

काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या बचावासाठी पुढे आला आहे. जयराम रमेश म्हणाले की, ‘भाजपच्या हेट फॅक्टरीचे एक घृणास्पद ट्विट व्हायरल होत आहे. ऑडिओमध्ये जे रेकॉर्ड केले आहे त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद लाभत असल्याने भाजप अधिकच हतबल झाला आहे, हा भाजपचा डाव आहे. या यात्रेला जनतेचा उदंड पाठिंबा मिळत आहे, असे रमेश यांनी सांगितले आहे.

Jesus Christ is the god, only real god, not like Sakthi & other Hindu gods – preaches George ponnaiya to Rahul Gandhi.

pic.twitter.com/SRVAfSsDyr

— Selva Kumar (@Selvakumar_IN) September 10, 2022

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Church Video Viral


Previous Post

कांदा शेतात पावसामुळे पाणीच पाणी, बाजरीचे मोठे नुकसान ( बघा व्हिडिओ)

Next Post

शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार तर एक जखमी

Next Post

शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार तर एक जखमी

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group