नाशिक : वडील हार्डवेअर दुकानात कामाला तर आई घर काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतांना, घरच्या परिस्थितीची जाण आणि अभ्यासात सातत्य ठेवत नाशकातील ओमकार कातकाडे ह्या युवकाने पहिल्याच प्रयत्नात सी. ए. परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या २१ व्या वर्षी सीए बनण्याचा बहुमान मिळवत इतर युवकांसमोर एक आदर्श उभा ठाकला आहे.
मूळ गाव ओझर येथील ओणे सुकेणे असलेले कातकाडे कुटुंबीय मुलांच्या शिक्षणासाठी नाशिकला स्थायिक झाले. ओमकारचे प्राथमिक शिक्षण रविवार कारंजा येथील बाल शिक्षणमंदिर , तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण बिवायके महाविद्यालयात पूर्ण केले. त्याने इयत्ता दहावीत ९१ टक्के , तर इयत्ता बारावी कॉमर्स शाखेत ८७ टक्के गुण मिळवले. दरम्यान, महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाच ओमकारणे सिएची सिपीटी परीक्षा देत दोनशे पैकी १८५ गुण मिळवत नाशकात पहिला येण्याचा बहुमान मिळवला होता. ओमकारणे डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते, मात्र सी. ए. सारखं काहीतरी आगळंवेगळं करून समाजात कुटुंबाचं मोठं नाव करावं अशी मनीषा बाळगत ओमकारणे सिए चा अभ्यास सुरु केला. कोरोना काळाचे आव्हान पेलत ओमकारने दिवस – रात्र एक करून सलग १८-१८ तास अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. ओणे सुकेने गावाच्या इतिहासात पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा बहुमान ओमकारणे मिळवला आहे. त्याच्यावर गावासह सर्व स्थरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे. ओमकारच्या या यशामागे त्याची आई सुनंदा, वडील शरद, आजोबा सुधाकर आव्हाड यांचे आशीर्वाद तर एसव्ही ट्यूटोरियलचे संचालक सीएविशाल पोतदार, सीएसमीर तोतले व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
मित्र संगत महत्वाची
आई-वडिलांसह थोरामोठ्यांचे आशीर्वाद. योग्य मित्र संगत. अभ्यासात सातत्य. आणि गुरुजनांचे मार्गदर्शन हीच यशाची खरी गुरुकिल्ली.
– सीए ओमकार कातकाडे