मुंबई – पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढल्याने सध्याच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे, त्यातच भारतीय वाहन बाजार इलेक्ट्रिक स्कूटर दिशेने वेगाने वाढ होत आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे, विशेषत: दुचाकी वाहनांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात आणत आहे.
ओला कंपनी 15 डिसेंबरपासून त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, S1 आणि S1 Pro ची डिलिव्हरी सुरू करणार असून मोबिलिटी फर्मचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर नवीन वितरण तारखेची घोषणा केली. Ola इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून Ola चाचणी राइड आणि अंतिम वितरण तारखा जाहीर करू शकले नाही.
गेल्या महिन्यात, ओलाने S1 आणि S1 Pro साठी चाचणी राइड्स सुरू केल्या. ओलाला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 10 लाख बुकिंग मिळाले आहेत. ओला इलेक्ट्रिकने 10 नोव्हेंबर रोजी बंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता येथे चाचणी राइड्स सुरू केल्या आणि त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी चेन्नई, हैदराबाद, कोची, मुंबई आणि पुणे या आणखी 5 शहरांमध्ये चाचणी राइड्स घेण्यात आल्या.
या कंपनीने Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर दोन प्रकारांमध्ये सादर केली असून S1 आणि S1 Pro, ची किंमत अनुक्रमे 99,999 आणि 1,29,999 रुपये आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 4G कनेक्टिव्हिटी सिस्टीम दिली आहे, जेणेकरून ती सतत इंटरनेटशी जोडलेली राहील. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनला या स्कूटरशी जोडून सर्व वैशिष्ट्ये ऑपरेट करू शकता, ज्यात स्कूटरची लॉक किंवा अनलॉक प्रणाली देखील समाविष्ट आहे.
https://twitter.com/bhash/status/1467140039771516928?s=20
ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 3.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर 8.5 kW पीक पॉवर जनरेट करते. 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरसह त्याची बॅटरी सुमारे 6 तासात पूर्णपणे चार्ज होईल, तसेच ही बॅटरी कंपनीच्या सुपरचार्जरद्वारे फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यां पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 180 ते 190 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते.