नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील नैताळे परिसरात ढगफुटी सदृष्य मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने या गावात व परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी झाले साचले होते. तर पावसाचा जोर एवढा होता की गावातील दुकानातही पाणी शिरले. तर शेत शिवारात राहणाऱ्या अनेकांच्या घरात गुडघ्या पर्यंत पाणी होते. घरातील भांडी पाण्यावर तरंगत होती. तर घरातील वस्तूंचा बचाव करण्यासाठी कसरत करावी लागत होती. या पावसामुळे या परिसरातील द्राक्ष असो की लागवड केलेल्या कांद्याना फटका बसणार आहे. जिल्ह्यात सलग परतीचा पाऊस विविध भागात झोडपत असून शनिवारी दुपारच्या सुमारास हा पाऊस झाला.