येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अचानक चालत्या मोटर सायकलच्या हेड लाईटमध्ये लपलेला कोब्रा जातीचा साप हॅँण्डल जवळ आल्यामुळे मोटरसायकलस्वाराची भंबेरी उडाली. हा साप फुत्कार मारु लागल्यामुळे मोटरस्वाराने गाडी थांबवत गाडी बाजूला लावली व त्यानंतर सर्प मित्र दिपक सोनवणे यांना बोलवले. त्यांनी गाडीचे हेडलाईट खोलत लपलेल्या सापाला शिताफीने पकडले. भर रस्त्यात घडलेली ही घटना पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली. अखेर सापाला पकडून त्याला जंगलात सोडून देण्यात आले. शहरातील व्यावसायिक विशाल देटके आपल्या पल्सर मोटर सायकलवरुन कामानिमित्त बाहेर जात असताना हा साप दिसला.