India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेतकरी हवालदिल; निफाडला बेमोसमी पावसाने द्राक्षासह गहू, कांदा, हरभरा, टोमॅटोचे लाखोचे नुकसान

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – ऐन होळीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान आले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्या मुळे शेतकरी वर्ग हवालदिल होऊन गेला आहे.

हवामान तज्ञांकडून ५ मार्चपासून आठ मार्च पर्यंत या संपूर्ण परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हा अंदाज चुकावा अशी प्रत्येक जण प्रार्थना करीत होता. मात्र काही उपयोग झाला नाही. सोमवारच्या पहाटे दोन वाजेपासूनच निफाड परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे चार तास पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला. जोरदार वारा आणि तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या गव्हाचे पीक आडवे पडल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांचे विक्रीला आलेले द्राक्षाचे पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट होण्याची वेळ आली आहे.

द्राक्षाचे लाखो रुपयांचे नुकसान
उन्हामुळे उन्हाचा चटका बसून द्राक्षांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी द्राक्ष घडाना खूप मोठा खर्च करून कागदाचे आवरण चढवावे लागते. लावलेला कागद पावसाच्या चार थेंबांमध्येच खराब होऊन जातो त्यामुळे इतका प्रचंड खर्च करून लावलेला कागद आणि त्यासाठी केलेले श्रम तर वाया जाणार आहेतच शिवाय या द्राक्ष घड्यांना आता बुरशी जीवाणूजन्य रोग आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.


Previous Post

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्याने केले लंपास

Next Post

अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आणि मुलांबाबत मौन सोडले; हे सगळं स्पष्ट सांगितलं…

Next Post

अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आणि मुलांबाबत मौन सोडले; हे सगळं स्पष्ट सांगितलं...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group