India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आणि मुलांबाबत मौन सोडले; हे सगळं स्पष्ट सांगितलं…

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आत्तापर्यंत या अभिनेत्याने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आता त्याने याबाबत आपले मौन सोडले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन त्याने अनेक बाबींचा खुलासा केला आहे.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिले आहे की, हे आरोप नाही तर मी माझ्या भावना व्यक्त करत आहे. या कॅप्शनसोबत त्याने त्याचे स्पष्टीकरणही जोडले आहे, जे त्याला याप्रकरणी सांगायचे आहे. निवेदनात अभिनेत्याने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

अभिनेत्याने लिहिले आहे की, माझ्या मौनामुळे लोक मला वाईट मानत आहेत, मी आतापर्यंत गप्प बसलो होतो कारण मला माहित आहे की माझी मुलं कुठून तरी हा तमाशा वाचतील. दरम्यान, सोशल मीडियावर आणि पत्रकारांनी मिळून माझ्या या घरगुती प्रकरणाचा खूप आनंद घेतला आहे, परंतु त्यानंतरही मला त्याबद्दल काही गोष्टी ठेवायच्या आहेत.

त्याने पहिल्या मुद्द्यात लिहिले आहे की, मी सर्वांना सांगू इच्छितो की मी आणि आलिया खूप वर्षांपूर्वी वेगळे झालो होतो आणि आमचा घटस्फोटही झाला होता. तीरी आमच्यात खूप समजूतदारपणा आहे. आम्हाला मुलेही होती. त्याचवेळी दुसऱ्या मुद्यात त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. कोणी सांगेल का माझी मुले गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत. तुमची मुले शाळेत येत नाहीत अशी पत्रे मला सतत शाळेतून येत आहेत.

This is not an allegation but expressing my emotions. pic.twitter.com/6ZdQXMLibv

— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) March 6, 2023

नवाजुद्दीनने पुढे लिहिले आहे की, “आलियाने माझ्या मुलांना ४ महिन्यांपूर्वी दुबईत सोडले होते. शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी ती गेल्या २ वर्षांपासून माझ्याकडून महिन्याला १० लाख रुपये घेत आहे. ती माझ्या मुलांची आई असल्याने तिच्या ३ सिनेमांसाठी मी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वेळोवेळी तिला आर्थिक मदत केली आहे”. तसेच, त्याने नमूद केले आहे की, माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले. मुलांसाठी मुंबईतील वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये मी घर घेतलं होतं. पण आलियाने ते घर विकलं आणि दुसऱ्या एका घरात ती मुलांसोबत भाड्याने राहत आहे. आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत”, असे त्याने स्पष्ट केले आहे.

Actor Nawazuddin Siddiqui on Wife and Children’s


Previous Post

शेतकरी हवालदिल; निफाडला बेमोसमी पावसाने द्राक्षासह गहू, कांदा, हरभरा, टोमॅटोचे लाखोचे नुकसान

Next Post

मोठी खुशखबर! ओझर एचएएलला मिळाले इतक्या हजार कोटींचे काम; ही विमाने तयार होणार

Next Post

मोठी खुशखबर! ओझर एचएएलला मिळाले इतक्या हजार कोटींचे काम; ही विमाने तयार होणार

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group