निफाड – WHO च्या नुकत्याच आलेल्या या अहवालानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला दावा १०० टक्के खरा ठरला असून मोदी सरकारची आकडेवारी लपवण्याचा डाव या अहवालामुळे जागतिक पातळीवर उघडा पडला आहे. जनमानसात उपरोक्त सत्य तथ्य मांडण्यासाठी आज रोज नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने निफाड तालुका काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. सदर पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांनी WHO तसेच US centre for global development चे अहवाल सादर करून राहुल गांधी यांनी कोविड मृत्यू संख्येबद्दल केलेल्या दाव्याच्या सत्येतेचे समर्थन केले.
तसेच राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या मागणीचे समर्थन केले.
आपत्कालीन मदतीच्या बाबतीत राज्याच्या SDRF (State disaster relief fund) वर सगळा भार टाकून केंद्राची NDRF (National Disaster relief fund) याबतीत जाणीवपूर्वक अलिप्त ठेवली गेली आहे. NDRF ने भाजप सरकार नसलेल्या राज्यांवर निधीच्या बाबतीत अन्याय केल्याचे तौक्ते वादळाचे उदाहरण देत सप्रमाण मांडले. फडणवीस सरकारच्या काळातील व त्यानंतर कोरोना काळातील मदतनिधी बाबतची केंद्राची विसंगती यावेळेस अधोरेखित केली गेली.तसेच या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव गौरव पानगव्हाणे यांनी ‘माझे गाव, माझी शाखा’ या आगामी महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल माहीती दिली. तसेच आगामी निवडणुकांमध्ये युवक उमेदवारांचा टक्का वाढण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.सुहास सुरळीकर, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सचिन खडताळे आणि इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
● भारत सरकारने कोविड मुळे ५.२५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
● कॅाग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही आकडेवारी जाहीर करत नोंद न झालेल्या लोकांची दखल घेत त्यांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
● महिन्याभराच्या आधी (17 एप्रिल) New York Times च्या बातमीचा दाखला देत राहूल गांधींनी देशात कोविड मुळे ४० लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा दावा करत, सरकार कोविड ची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला होता.
● नोव्हेंबर २०२१ मध्येही राहुल गांधींनी सरकारच्या आकडेवारी फसवी असल्याचं सांगितलं होतं.