नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील उगावचे भूमिपुत्र जवान जनार्दन ढोमसे यांना जम्मू आणि काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना वीरमरण आले आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या शहीद जवान जनार्दन ढोमसे यांना शालेय जीवनापासूनच सैन्य दलाची आवड होती. त्यांनी शेतकरी कुटुंबातून पुढे येत आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी सैन्यदलाची तयारी केली. त्यानंतर ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते.
ढोमसे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने फोनद्वारे ही माहिती दिली आहे.आज रात्री उशिरा त्यांचे पार्थिव उगाव गावी येणार असून उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तम बाबुराव ढोमसे या शेतकऱ्याच्या कुटुंबात जनार्दन यंचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले. १२ वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातूर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता. २००६-०७ मध्ये सर्वप्रथम कच्छ, भूज त्यानंतर त्रिपुरा, आसाम आणि आता जम्मू काश्मीर येथे त्यांनी सेवा बजावली. वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तमराव ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त मरळगोई खुर्द येथे राहतात. जनार्दन ढोमसे यांच्या पश्चात पत्नी रोहिणी, मुलगा पवन (वय वर्ष ८), मुलगी आरु (वय वर्ष २), आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ दिगंबर असा परिवार आहे.
ढोमसे यांच्या निधनाने देशाने एक वीर सुपुत्र गमावला असून मी व माझे कुटुंबीय ढोमसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
निफाड तालुक्यातील उगावचे भूमिपुत्र जवान जनार्दन ढोमसे यांना जम्मू आणि काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना वीरमरण आले.शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या शहीद जवान जनार्दन ढोमसे यांना शालेय जिवनापासूनच सैन्य दलाची आवड होती त्यांनी शेतकरी कुटुंबातून पुढे येत आपले pic.twitter.com/z6PmiGB05y
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 28, 2022
Niphad Jawan Janardan Dhomse Martyred in Jammu Kashmir