India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमश: मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा प्रतष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील कमानी सभागृहात मंगळवारी युवा साहित्यिक पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमी चे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्य‍िक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी पुरस्कार
मराठी भाषेसाठी युवा साहित्य‍िक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत मी संदर्भ पोखरतोय या शिर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले. मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणुस करू शकतो. अशा आशायाच्या कविता या काव्य संग्रहात असल्‍याचे श्री नालट म्हणाले. श्री नालट हे मुळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार
मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्य संग्रहात करण्यात आलेला आहे. हे काव्य सात विभागात आहे. प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आलेली आहे.
श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत. श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्यचा पुरस्कार
‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या ग़ज़ल संग्रह सामाजिक संबंध, मानवीय मूल्य, श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत. मुंबईचे मकसूद आफ़क़ हे शिक्षक आहेत. त्यांनी ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीज साठी गीत लिहीले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्काराने ही सन्मानित करण्‍यात आलेले आहे.

Maharashtra Three Authors Yuva Sahitya Puraskar


Previous Post

या प्रश्नावरुन गाजली पुणे विद्यापीठ सिनेट बैठक; अखेर कुलगुरूंनी घेतला हा निर्णय

Next Post

निफाड तालुक्यातील जवान जनार्दन ढोमसे यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण; उगाव गावावर शोककळा

Next Post

निफाड तालुक्यातील जवान जनार्दन ढोमसे यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण; उगाव गावावर शोककळा

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group