India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निफाड तालुक्यातील लाचखोर कोतवाल एसीबीच्या जाळ्यात; या कामासाठी मागितले ३ हजार रुपये

India Darpan by India Darpan
January 25, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील भरवस येथील कोतवालाला ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. लक्ष्मण फकीरा वैराळ असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे वडिलोपार्जित जमिनीचे खाते वाटप आदेश तहसील कार्यालय, निफाड यांच्याकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशाप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर नोंद करणे आवश्यक होते. तसेच, ही नोंद मंजूर करून देण्याकरिता कोतवाल वैराळ याने अर्जदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यात ३ हजार आणि नंतर २ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात वैराळ हा लाच घेताना पकडले गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एसीबीद्वारे पुढील कार्यवाही सुरू आहे.

या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे,  पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

Niphad Crime ACB Trap Bribe Corruption


Previous Post

ICC पुरस्कार : सूर्यकुमार यादव वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू

Next Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

Next Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group