India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इकडे लक्ष द्या! नवी मुंबईतील वाहतुकीत १५ व १६ एप्रिल रोजी मोठा बदल; कोणते रस्ते बंद? कोणते आहेत पर्यायी मार्ग?

India Darpan by India Darpan
April 14, 2023
in राज्य
0

 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन – बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद:-
दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

ब) पर्यायी मार्ग:-
२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.
(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.

नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद
नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्हयातून व इतर राज्यातून खारघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जाणार व येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी याकरीता दि. 15 एप्रिल 2023 रोजी दु. 14.00 वा. ते दि. 16 एप्रिल 2023 रोजी रात्रौ 23.00 वा. पर्यंतच्या कालावधीत नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात सर्व जड – अवजड वाहनाच्या येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
दि. १५ एप्रिल २०२३ रोजीच्या दु. १४.०० वाजेपासून ते दिनांक १६ एप्रिल २०२३ च्या रात्री २३.०० वा. पर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खालील नमुद मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
१. ठाणे जिल्ह्यातून ऐरोली टोल नाका, तसेच विटावाकडुन ठाणे बेलापुर रोडने तसेच शिळफाटयाकडुन महापे व तळोजा कडुन जुना मुंबई पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२. मुंबई शहराकडून सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका व पूर्व द्रुतगती मार्गानि ऐरोली टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
३. गोवा महामार्गाने खारपाडा टोलनाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड- अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

४. पुणे मुंबई महामार्ग व पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने कोनफाटा पळस्पे सर्कल शेडुग टोल नाका मार्गे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५. जेएनपीटी बंदर, उरण पनवेल येथील सर्व सीएफएस एमटीयार्ड, व इतर आस्थापना यांच्याकडुन गव्हाणफाटा, दास्तानफाटा तसेच पनवेल टी पॉईट मार्गाने सायन-पनवेल मार्गावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत येणा-या व जाणा-या जड अवजड वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. नवी मुंबई आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांवर जड अवजड वाहनाना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
तसेच सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही अत्यावश्यक सेवेतील जट-अवजड वाहनाना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.

नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल
नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे से.35 कडील नियोजित वाहनतळाकडे जातील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे
अ) प्रवेश बंद:-
दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी 14.00 वाजे पासून ते दिनांक 17 एप्रिल 2023 च्या सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

ब) पर्यायी मार्ग:-
1) पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावून पुढे इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री. काकडे यांनी कळविले आहे.

New Mumbai 15 and 16 April Traffic Diversion


Previous Post

येथे खऱ्या अर्थाने साजरी झाली डॉ. आंबेडकर जयंती… असं काय केलं कुसमाडी गावानं… तुम्हीच बघा

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – सायकलस्वाराला धडक

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - सायकलस्वाराला धडक

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group