नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात घराणेशाही ही केवळ काँग्रेस पक्षात नसून सर्वच पक्षात दिसून येते. मात्र कारण काँग्रेसवरच घराणेशाहीचा वारंवार आरोप होतो, याला कारण म्हणजे गेल्या चार पिढ्यांपासून काँग्रेसचे अध्यक्षपदी एकाच कुटुंबाकडे तथा परिवाराकडे आहे ते म्हणजे नेहरू गांधी घराणे होय.
काही वेळा सलग तर काही वेळा खंडितपणे या कुटुंबातील एकूण सहा जणांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. परंतु आता पुन्हा एकदा नेहरू गांधी घराण्याऐवजी अन्य व्यक्तीची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी पक्षांतर्गत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी पुन्हा पदभार स्वीकारण्यास तयार नाहीत, त्यामुळे दुसरा पर्याय काय? याबाबत काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 21 ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून ती 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाबाबतची चर्चा झाली. या चर्चेनंतर सध्या सोनिया गांधी याच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. तसेच नवीन अध्यक्षाची निवड सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात येणार असल्याचे ठरले आहे .
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, ‘मतदानासाठी प्रतिनिधींची यादी तयार आहे. आमच्या बाजूने आम्ही तयार आहोत. काँग्रेस कार्यकारिणीने निवडणुकीची तारीख ठरवायची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.
पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधींसह बहुतेक काँग्रेस नेत्यांचे असे मत आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, परंतु यावर राहुल गांधींच्या होकाराची प्रतीक्षा आहे. राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, अशी भावना बहुतांश नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे यात शंका नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वत: तयार असणे आवश्यक आहे.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडल्यानंतर अनेक प्रसंगी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी गळ घातली, परंतु त्यांच्या वतीने त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. आता अध्यक्ष निवडीची दिशा त्यांच्या ‘होय आणि नाही’ वर अवलंबून आहे.
विशेष म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसचे जाळे विणणाऱ्या बहुतांशी कार्यकर्त्यांची माहिती सोनियाजी गांधींना असणे अशक्यप्राय आहे. किंबहुना, कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांकडून अशी अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. काँग्रेसची अनेक दशकांची कार्यपद्धती पहिल्यास केंद्रीय नेतृत्व प्रत्येक राज्यासाठी नेमलेले निरीक्षक व त्या राज्यांतील प्रमुख नेते यांच्यावर मदार ठेवत आले आहे.
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी असा
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017
18) राहुल गांधी – 2017 पासून 2019
19 ) सोनिया गांधी – 1919 ते 2022 (आजपर्यंत)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या सर्वात जास्त काळ सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या सोनिया गांधी अध्यक्षा आहेत. त्यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ७ वर्षांनी १९९८ मध्ये सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले.२०१९ साली राहुल गांधींनी, त्यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर त्या परत अध्यक्ष झाल्या.
सोनिया गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सल्लागार समितींच्या अध्यक्षस्थानी होत्या. माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा आणि मनरेगा या देशाच्या विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांचा परदेशातील जन्माच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर नेहमी टीका आणि वाद होतो. तसेच तब्येतीच्या कारणावरून त्यांनी संपुआ (युपीए) सरकारच्या दुसऱ्या कालखंडात सक्रीय राजकारणात सहभाग कमी घेतला. गांधींनी जरी सरकारचे कुठलेही खाते कधी सांभाळले नसले तरी त्यांचा भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली व्यक्तींमध्ये समावेश होतो. जगातील सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये समावेश केला गेला आहे.
राहुल गांधी हे भारतीय राजकारणी आणि संसद सदस्य आहेत.ते केरळमधील वायनाड मतदारसंघाचे १७व्या लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून त्यांनी १६ डिसेंबर २०१७ ते ३ जुलै २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. गांधी हे भारतीय युवक काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच राजीव गांधी फाउंडेशनचे व राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत. अध्यक्षपदी आरूढ होणारे ते नेहरू-गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती व ६० वे अध्यक्ष होते. तसेच राहुल गांधी २०१३ पासून पक्षाच्या उपाध्यक्षपदी होते.
काँग्रेस पक्षात या अभूतपूर्व र्हासाबद्दल चर्चा होत आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील ‘जी २३’ या गटाने सोनिया गांधींना अनावृत्त पत्र लिहिले होते. पण, त्यांची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा. यामुळे कितीसा फरक पडेल? खरी समस्या पूर्ण वेळ अध्यक्ष नसणे ही आहे का? याचा विचार मात्र कोणी करताना दिसत नाही. सर्व देशभर कमी अधिक प्रमाणात जनाधार आहे. याचा अर्थ हा पक्ष आपोआपच भाजपचा प्रतिस्पर्धी होतो, असं मात्र नाही.
यंदा अध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
1. अंबिका सोनी
2. अशोक गेहलोत
3. मल्लिकार्जुन खरगे
4. केसी वेणुगोपाल
5. कुमारी सैलजा
6. मुकुल वासनिक
New Congress President from without Gandhi Family Chances Names
Politics Indian Congress Sonia Gandhi Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra
Election September