Last updated on September 21st, 2022 at 12:35 pm
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा बँकेचा २०२२-२०२३ कर्ज वसुली हंगाम लवकरच सुरु होत असल्याने जिल्हा बँकेची शेती कर्जाची एकूण १९१० कोटीची रक्कम वसुलीस पात्र असून त्यापैकी १३७० कोटीची जुनी थकबाकी आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होण्यासाठी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची, खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध होण्यासाआठी जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे ( ऐपतदार ) व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेश दिले असल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली आहे.
या आदेशानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील ऐपतदार व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधीनियम १९६० अन्वये योग्य त्या कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नाही. अशा प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून अशा थकबाकीदार सभासदांचे बँकेस प्राप्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम नुसार थकीत कर्ज रकमेसाठी तालुकानिहाय व जिल्हा १०० थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात / विविध कार्यकारी संस्थेत / जिल्हा बँकेच्या शाखेत जाहीर करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच तालुकयातील १०० थकबाकीदारांची नावेही वर्तमानपत्रात जाहीर करणार असून नाशिक जिल्ह्यातील मोठे व ऐपतदार १०० थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात व विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयात जाहीर करण्यात आले आहेत.
बँकेच्या प्रशासकानी बँकेची सूत्र हातात घेतल्या नंतर ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याना आदेश देऊन कर्ज वसुलीचे प्रयत्न केले होते त्यात जंगम जप्ती व्दारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रकटर, जीप यांची जप्ती करून जवळपास ३५० वाहनांची जप्तीव्दारे / लिलावाव्दारे ६ कोटी रकमेची वसुली झाली आहे. मार्च २०२३ अखेर जास्तीत जास्त कर्ज वसुली होण्यासाठी कर्ज वसुली मोहीम राबवून व जुने तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना सहकार कायदा १९६० व १९६१ चे नियम १०७ नुसार प्राप्त अधिकारान्वये जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून पुढील लिलाव प्रक्रिया पर्यंतच्या कार्यवाही साठी आदेशही देण्यात आलेले आहेत
तालूक्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यानी तसेच नाशिक येथील केंद्र कार्यालयातील ऑफिस येथील कर्मचाऱ्यानी सर्वतोपरी प्रयत्न करूनही जुने मोठे व ऐपतदार थकबाकीदारांकडून सहकार्य मिळत नसल्याने. अशा १०० थकबाकीदार सभासदांची यादी वर्तमान पत्रात प्रसिद्ध करून त्यांना थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानी प्रतिसाद दिला नाही तर कायद्यातील तरतुदीनुसार मोठे व ऐपतदार थकबाकीदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्यावतीने बँकेचे प्रशासक अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी बँकेच्यावतीने केले आहे.
बघा, टॉप १०० थकबाकीदारांची नावे
NDCC Bank Top 100 Defaulters Loan Finance
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD