नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी वातावरण तयार होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. महाराष्ट्रातही भाजपला दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी स्थापण्यात आली. आणि आता नागालँडमध्ये शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी ही भाजपसोबत जाणार आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या आहेत. एनडीपीला २५, भाजपला १२ जागा जिंकल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी एनडीपी आणि भाजपकडे बहुमत आहे. असे असतानाही राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता याठिकाणी विरोध पक्षच राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. नागालँडच्या निवडणुकीत एनपीपीने ५, नगा पिपल्स फ्रंट २, लोकशक्ती जनता पार्टी (रामविलास पासवान) २ आणि रिपाइ (आठवले) यांनी २ जागा जिंकल्या आहेत. जनता दल युनायटेडने १ आणि ४ अपक्ष निवडून आले आहेत.
भाजपसोबत जाण्याची खेळी नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देशभरात भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे कारण देत पवारांसह देशातील ९ विरोधी पक्षांनी त्यांच्या स्वाक्षरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी आघाडी तयार होत असल्याचे दिसत असतानाच आता पवारांनी नागालँडमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
https://twitter.com/_prashantkadam/status/1633359357718171649?s=20
NCP Sharad Pawar Decision Nagaland BJP Alliance