मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे. या चौकशीला खडसे हजर झाले आहेत. भोसरीतील जमीन प्रकरणी ही चौकसी सुरू आहे. याच प्रकरणाअंतर्गत ईडीने खडसे यांच्या जावयालाही अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पाटील म्हणाले की, खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत आहे. मात्र खडसे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पाटील काय म्हणाले त्याचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील निळ्या गोलवर क्लिक करा
https://twitter.com/NCPspeaks/status/1413074661240307712