मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वादग्रस्त विधानांसाठी फेमस आहेत. त्यांच्या विधानानंतर विरोधकांची कडवी प्रतिक्रिया आलीच म्हणून समजा. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा उल्लेख करीत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर बराच गोंधळ झाला होता. आता त्यांचे एक नवे ट्वीट चर्चेत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या नव्या ट्वीटमध्ये राम आणि रावणाचा उल्लेख आहे. त्यांनी रामायणातून रावण काढून राम समजावून सांगा, असे म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या एका विधानावर घेण्यात आलेल्या आक्षेपावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या संदर्भाने हे विधान केले होते. त्यावर सोशल मीडियासह इतर माध्यमांवर देखील त्यांच्या विरोधात बोलले गेले. त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी हे नवे ट्विट केले आहे. यात त्यांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा हे हॅशटॅग दिले आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1622137536993959936?s=20&t=_eRT4s3yAULdocdRjwFhiQ
काय म्हणाले आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये इतरही उल्लेख आहेत. ते म्हणतात, ‘महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्ण व अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजुला काढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्याचा लढा समजावून सांगा.’ या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
आव्हाड यांचा निषेध
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर नागपूर, पुणेसह विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. भाजपसह इतर काही पक्षांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. तर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हटले.
पुण्यातील वादही ताजा
एकदा पुण्यात बोलताना आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, ‘विनोद तावडे एकदा म्हणाले होते की एमपीएससीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो पुढे औरंगजेब, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना?’ यातही काही आक्षेपाह्र शब्दांचा उल्लेख होता. त्यावर वाद निर्माण झाला होता.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1622491299432566785?s=20&t=_eRT4s3yAULdocdRjwFhiQ
NCP Leader Jitendra Awhad Statements Controversy