India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नवजीवन विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात संपन्न झाले हे उपक्रम

India Darpan by India Darpan
February 6, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास’ या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच दुसरा दिवस ग्रामपंचायत, ग्राम संस्कार केंद्र विचुरीगवळी ता. जि. नाशिक येथे संपन्न झाला. आज सकाळच्या सत्रामध्ये रा. से. यो. च्या स्वयंसेवकांनी योगाचे धडे गिरविले. स्वयंसेवकांचे निवासस्थान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यात विविध सामाजिक जनजागृती करणाऱ्या घोषणांची आतषबाजी करण्यात आली. स्वयंसेवकांनी गावातील ग्रामपंचायत परिसर तथा विविध तीन ठिकाणच्या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली.

संध्याकाळच्या वैचारिक प्रबोधन या सत्रात डॉ. समीर चव्हाण सर (नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक तथा सदस्य, विधी अभ्यासमंडळ, सा. फु. पु. वी. पुणे) यांनी राष्ट्र उभारणीसाठी युवकांचा सहभाग या विषयावर सखोल मार्गदर्शन करून व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफले. बोलतांना ते म्हणाले, केवळ वयाचं तारुण्य असून चालत नाही तर प्रत्येक व्यक्तींनी मनाने आणि विचाराने चिरतरुण राहावे. हाच राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया ठरणार आहे. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध महापुरुष आणि महामानवांचे दाखले देऊन अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर विषय ठेवला. आजचा युवक बेकरी, बेरोजगारी, तणाव, व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, असामाजिकता आणि समाजमाध्यमाच्या विळख्यात अडकलेला युवक इत्यादी समस्यांचा सामना करत असल्याचं मत व्यक्त केलं.

बदलत्या काळानुसार समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या अपेक्षाही बदलत असतात. आज देशासाठी मर मिटण्याची वेळ नाही, तर स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी छोट्या छोट्या दैनंदिन कृतीतून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावता येईल. २१ व्या शतकातील विद्यार्थी म्हणून 4-D (Devotion, Descipline, Dedication & Determination) आणि 5-C (Competance, Confidence, Connection, Character & Caring) चा योग्य वापर करून राष्ट्र उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या डॉ. प्रज्ञा सावरकर मॅम विचारमंचावर उपस्थित होत्या. त्यांनी विविध विषयांवर अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.

पुणे विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक
पुष्कर दिपक पाडेकर यांची सदिच्छा भेट

दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे जिल्हा समन्वयक पुष्कर दिपक पाडेकर यांनी नवजीवन महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर ठिकाण विंचूर गवळी येथे सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना श्रम संस्काराचे महत्व तसेच गावाचा इतिहास गावातील लोकांची संपर्क कसा साधावा याबद्दल माहिती दिली त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शाहिस्ता इनामदार मॅडम कार्यक्रम अधिकारी सौ शालिनी घुमरे मॅडम व शिबिरातील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते


Previous Post

नदीपात्रात अर्भकासह तरूणाचा मृतदेह आढळला; दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विविध वक्तव्यांवरुन मोठा वाद; बघा, काय म्हणाले ते?

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विविध वक्तव्यांवरुन मोठा वाद; बघा, काय म्हणाले ते?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group