India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘आज माझ्या लग्नाचा वाढदिवस, हवालदार माझ्या घरी आला आणि मला ईडीची नोटीस देऊन गेला’ – जयंत पाटील

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. सर्वांचे लक्ष त्या निकालाकडे लागले आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी यापूर्वी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली असून त्यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. या नोटिशीबाबत जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे ते म्हणाले की, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि आजच माझ्या घरी हवालदार आला आणि मला ईडीची नोटिस देऊन गेला.

ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे. ईडीची नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांनी आयएलएफस च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते.

जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली आहे. मात्र जयंत पाटील यांना ईडीची नोटीस येणे हा योगायोग आहे असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या आधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.

आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. अशा नोटीसा शरद पवारांपासून अनेक नेत्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांमुळे राष्ट्रवादी कमकुवत होण्याऐवजी आणखी भक्कम होत आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

NCP Leader Jayant Patil ED Notice


Previous Post

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत छगन भुजबळ म्हणाले…

Next Post

मुक्तीधाम येथे पादचारी महिलेचा विनयभंग तर नाशिकरोडच्या हॉस्पिटलमध्ये महिलेशी अश्लिल वर्तन

Next Post

मुक्तीधाम येथे पादचारी महिलेचा विनयभंग तर नाशिकरोडच्या हॉस्पिटलमध्ये महिलेशी अश्लिल वर्तन

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group