India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘त्या’ वक्तव्याबाबत अखेर छगन भुजबळांनी सभागृहाला दिले हे स्पष्टीकरण (Video)

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in राज्य
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “पूर्वी असे म्हणत असत की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे” असे वक्तव्य केले होते मात्र यावर काही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र सदरचे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि जे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले.

छगन भुजबळ यांनी पुरवणी मागण्या दरम्यान वापरलेल्या म्हणी बाबत महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर यांनी ही आपल्या भाषणात ही म्हण वापरली असल्याचा दाखला देखील असल्याचे इतिवृत्त सभागृहासमोर ठेवले. तसेच या दाखल्यांप्रमाणे मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे या वाक्याचा म्हण म्हणूनच इतिवृत्तात समावेश करावा असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत छगन भुजबळ यांच्या स्पष्टीकरणाचे समर्थन केले. तसेच सभागृहात बोलतांना म्हणींचा वापर केल्यानंतर त्याचा कुणीही वेगळा अर्थ घेऊ नये असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना "पूर्वी असे म्हणत असत की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे" असे वक्तव्य केले होते मात्र यावर काही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता.मात्र सदरचे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि जे वक्तव्य म्हण pic.twitter.com/Ziogezjaj5

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 27, 2022

NCP Leader Chhagan Bhujbal Clarification on That Statement
Maharashtra Winter Assembly Session Nagpur


Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दिलासा; अखेर तुरुंगाबाहेर येणार

Next Post

काजळे ज्वेलर्समध्ये पहाटे चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Next Post

काजळे ज्वेलर्समध्ये पहाटे चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group