मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख हे आता उद्याच तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांचे नववर्ष तुरुंगात नाही तर त्यांच्या घरीच जाणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, देशमुख यांनी १०० कोटी रुपये दरमहा वसुलीचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर याप्रकरणाची ईडी आणि सीबीआयने गंभीर दखल घेतली. देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक झाली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी आज झाली. देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे देशमुख यांचा जामीन कायम असून आता त्यांची उद्याच तुरुंगातून सुटका होणार आहे. जवळपास वर्षभराने देशमुख हे तुरुंगाबाहेर येणार आहेत.
NCP Leader Anil Deshmukh Relief High Court CBI Order
Bail