मुंबई – वानखेडे-मलिक यांच्यातील जुगलबंदीचा नवा अंक आज सकाळीच पहायला मिळाला आहे. नवाब मलिक यांनी बदनामी केल्याच्या विरुद्ध समीर वानखेडे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी काही वेळातच होणार आहे. या सुनावणीपूर्वीच मलिक यांनी वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला सर्वांसमोर आणला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळीच वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला प्रसारित केला आहे. या दाखल्यानुसार, वानखेडे हे मुस्लिम आहेत. तसेच, वानखेडे हे कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत, असे या दाखल्यावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे वानखेडे यांनी स्पर्धा परीक्षा आणि सध्याची नोकरी ही आरक्षणाच्या माध्यमातून मिळविली असल्याचा मलिक यांचा ठोस दावा आहे. यासंदर्भात हा पुरावा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सुद्धा वानखेडे यांचा जन्म दाखला शेअर केला होता. त्यानंतर आता मलिक यांनी शाळा सोडल्याचा दाखला सर्वांसमोर आणला आहे. थोड्याच वेळात याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते किंवा न्यायालयात काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मलिक यांनी शेअर केलेला वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला असा