India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निसर्गचक्रच बिघडलं… मान्सून अजून अंदमानातच…. इकडे मोराने भर उन्हात फुलवला पिसारा (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 22, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक तपमान वाढ आणि हवामान बदलाची जोरदार चर्चा होत आहे. अवकाळी पावसाच्या अनुभवामुळे तर साऱ्यांच्याच तोंडी एक वाक्य आहे ते म्हणजे निसर्ग चक्र बदलले आहे. याचा प्रत्यय वेळोवेळीही येतच आहे. आता तर पशुप्राण्यांद्वारेही त्याचे संकेत दिसायला लागले आहेत. पावसाळ्यात आनंदाने पिसारा फुलवून नाचणारा मोर आता चक्क कडाक्याच्या उन्हातच हे कृत्य करु लागला आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्याचे वातावरण आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

शेतात पाणी पिण्यासाठी आलेल्या कळपातील एका मोराने चक्क उन्हाळयाच्या दिवसात पिसारा फुलवल्याच दृष्य प्रविण आहेर यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. पिसारा फुलवून नाचणा-या मोराचे मनमोहक दृष्य त्यांनी नंतर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

उन्हाचा पारा सर्वत्रच चाळीशीच्या आसपास पोहचलेला आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सर्वत्रच भटकंती सुरु होते. नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या रेंडाळे येथील वन्यप्रेमी प्रविण आहेर यांनी आपल्या शेतात पशू-पक्षी व मोरांसाठी नेहमी प्रमाणे पाण्याची सोय केलेली असून भर उन्हाळयात पाणी पिण्यासाठी मोर, लांडोर यांचे कळप तेथे पाणी पिण्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ येत असतात. यावेळीच त्यांनी पिसारा फुलवण्याचे दृष्ट कॅमेरात कैद केले आहे.

Nashik Yeola Peacock Dance in Summer Video


Previous Post

नाशकात वाहन चोरीची मालिका सुरूच; पिकअपसह दुचाकी लांबवली

Next Post

मुंबईतला उकाडा पाहून राज्यपाल थेट महाबळेश्वर दौऱ्यावर… पुस्तकांच्या गावाला दिली भेट

Next Post

मुंबईतला उकाडा पाहून राज्यपाल थेट महाबळेश्वर दौऱ्यावर... पुस्तकांच्या गावाला दिली भेट

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group