चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उमराना मार्केट मध्ये कांदा विक्रीस गेलेल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर चोरट्यानी लांबवल्याची घटना घडली आहे. बागलाण तालुक्यातील सुराने येथील शेतकरी सागर सुभाष अहिरे हे उमराना मार्केट मध्ये कांदा विक्रीस घेऊन गेले. कांदा विक्री झाल्यावर संध्याकाळी साडे सात वाजता त्यांनी ट्रॅक्टर बाजूला लावला.
मालाचे पैसे व पावती घेण्यास गेले. परत आल्यावर त्यांना जागेवर ट्रॅक्टर दिसला आहे. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर त्यांना लक्षात आले की आपल्या ट्रॅक्टरची चोरी झाली आहे. चिंचवे गावाच्या पुढे शोधा दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे ट्रॅक्टर सहित आढळून आले आहेत. या चोरी प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.