India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इयत्ता बारावीचा निकाल थोड्याच वेळात…. पाहण्यासाठी येथे क्लिक करा

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल उद्या, २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईनरित्या जाहीर केला जाणार आहे. परीक्षेचा सीट नंबर (रोल नंबर) आणि आईचे नाव निकाल पाहण्यासाठी आवश्यक असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.

यासाठीच्या सविस्तर सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजना उपलब्ध राहील. या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत वितरित करण्यात येतील. इयत्ता १२ वी परीक्षेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व राज्य मंडळातील तसेच सर्व विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले आहे.

HSC Result 2023 Date Check Links


Previous Post

आली लहर, केला कहर… न्यायमूर्तींच्या कारमधून थेट फेरफटका मारला… असे फुटले बिंग… अखेर पोलिसावर झाली ही कारवाई…

Next Post

कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टरच लांबवले; उमराण्यातील प्रकार (व्हिडिओ)

Next Post

कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टरच लांबवले; उमराण्यातील प्रकार (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group