India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काय सांगता? डोक्यावरुन वीज गेल्यानंतरही महिला जिवंत; कसं काय? त्र्यंबक तालुक्यात नेमकं काय घडलं?

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देव तारी त्याला कोण मारी? ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आयुष्याची दोरी बळकट असली की मृत्यूच्या दाढेतून माणूस सुखरुप परत येतो. त्र्यंबक पंचक्रोशितील लोकांना याचा प्रत्यय आज पुन्हा बघावयास मिळाला. डोक्यावर वीज कोसळूनही महिला जिवंत राहिली. या घटनेची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलले आहे. त्यामुळेच अवकाळी पाऊस, वीजांचा कडकडाट, गारपीट असा अनुभव येत आहे. असेच बदलते हवामान तालुक्यातही आहे.  शुक्रवार, दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला. याचवेळी तान्हाबाई पुंडलिक पोटिंदे (वय ६५ वर्षे) या त्यांच्या पिंपळद शिवारातील शेतात होत्या. लाकडे भीजू नये म्हणून ती गोळा करून झाकण्यासाठी त्या शेतातीलच घराबाहेर आल्या.

त्याचक्षणी तान्हाबाईंच्या डोक्यावरून वीज गेली आणि शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडावर कोसळली. वीज डोक्यावरून गेल्याने तान्हाबाईंचे केस आणि अंगावरील लुगडे जळाले. यादुर्घटनेत त्या बेशुद्ध झाल्या. आपली आई बेशुद्ध झाल्याचे पाहून मुलगा सोनू याने तात्काळ त्र्यंबकेश्वर येथील माऊली हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉ. पंकज बोरसे यांनी उपचार केले. तान्ह्या बाई यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना काही त्रास जाणवल्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येईल अन्यथा येथेच उपचार सुरू ठेवू असे डॉ. पंकज बोरसे यांनी सांगितले. तान्ह्याबाई या मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी परमेश्वराचे आभार मानले आहे..

Nashik Trimbakeshwar Lightening Women Farmer Save Life


Previous Post

अवघ्या काही तासातच मंदिरासमोरील दानपेटी फोडून रोकड लांबविणा-या तिघांना पोलिसांनी केले गजाआड

Next Post

नाशिककरांनो, लष्कराची विविध साहित्य, हत्यारे आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नक्की बघा; गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Next Post

नाशिककरांनो, लष्कराची विविध साहित्य, हत्यारे आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नक्की बघा; गडकरींच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023

या राज्यात तांब्यासोबत आढळली सोन्याची खाण

March 22, 2023

पाडवा पटांगणावर शिवकालीन शस्त्रविद्या व भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण

March 22, 2023

कृषीमंत्र्यांकडून शेतपिकांच्या नुकसानीची अंधारात पाहणी; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group