नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असून नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ७५ टेम्पोच्या सहभागातून वाहतुकीच्या जनजागृतीसोबतच स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या वीरांबद्दल माहिती देणाऱ्या पोस्टरच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर करत नाशिक शहरात भव्य रॅली काढली. या रॅलीचे शहरात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून नेहमीच अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम साजरे केले जातात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती व प्रबोधन रॅली नाशिक ट्रान्सपोर्टच्या वतीने काढण्यात आली. या रॅलीत एकूण ७५ टेम्पोचा समावेश होता. यामध्ये क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक तसेच वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन देखावे, राष्ट्रध्वज सजावट याचा समावेश होता. तसेच संपूर्ण रॅली दरम्यान देशभक्तीपर गीतांचे वादन करण्यात आले.
सदर रॅली दुपारी २ वाजेच्या दरम्यान नाशिक शहरातील द्वारका येथून सुरू होऊन सारडा सर्कल मार्गे गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, शरणपूर सिग्नल, एबीबी सर्कल, सातपूर, पपया नर्सरी सिग्नल, गरवारे, राणे नगर, लेखानगर मार्गे मुंबई नाका द्वारका येथे ३:३० वाजेच्या दरम्यान संपन्न झाली. या रॅलीला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम.सैनी, पदाधिकारी अमोल शेळके, सदाशिव पवार, सुनिल बुरड, बालजित शर्मा, भगवान कटिरा, सुभाष जांगडा, ओमकार कानडे, जयपाल शर्मा, शंकर धनावडे, संजय राठी, दीपक ताकाटे, मनोज उडावंत, शरद जगताप, बजरंग शर्मा, महेंद्र सिंग राजपूत,.दीपक ढिकले, सुनिल जांगडा, महावीर मित्तल, विशाल पाठक, सिध्देश्वर साळुंके, राजेश शर्मा, दीपक पांडे, सतीश चौधरी, हरिकिषण पारिक, रामभाऊ सूर्यवंशी, इश्र्वरदास बन्सल, दीपक पांडे, जनार्दन खाडे, विनोद चौधरी, क्रिसन राम, कृपाशंकर सिंग यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.